Nojoto: Largest Storytelling Platform

आई कुठे काय करते ? पहाटेपासून ते झोपेपर्यंत राबराब

आई कुठे काय करते ?
पहाटेपासून ते झोपेपर्यंत राबराब राबते
मुलांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी 
सतत झटत असते, 
मुलांचे स्वप्न , शिक्षणासाठी उन्हातान्हात स्वतःला करपते

आई कुठे काय करते?
मुलांना इजा झाली तर , तिची रात्रोची झोप हरपते,
मुलाबाळांशी भांडते , नंतर तीच  सांत्वन करते, 
पहाटेपासून कसरत करताना तीच शरीर शिण पडते, 
पण ती निस्वार्थपणे स्वतःचे जीवन कामात सारते.

आई कुठे काय करते ?
मुलींच्या विवाहासाठी पैका जुळवताना,
स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन शेतात राबते, 
ती कमावते , पण कधीच  स्वार्थपणा नाकारते.

आई कुठे काय करते ?
जेव्हा तिचे बाळ शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला असते,
तेव्हा तिचे मन त्याच्यांत गुंतलेले असते, 
अक्षरशः तिचे मन जळते, 
 पण त्याला त्रास होऊ नये म्हणून ती स्वतःला सावरते.

आई कुठे काय करते?
स्वतःच्या बाळाला जोपासताना त्याला धैर्य, करुणा, प्रेम , प्रामाणिकता ,आदर , सन्मान या गुणांची सांगड घालते,
सामोरे जाऊन तेच बाळ आईला विसरतो,
तेव्हा तेव्हा ती  जिवंतपणी स्वतःला  मारते.

अरे पण आई कुठे काय करते..........

_ Vaibhav Masirkar # आई कुठे काय करते ? Roshan Dnyaneshwar Ingle