Nojoto: Largest Storytelling Platform

युध्द ... युध्द ते विचारांचे आहे नाही ते मानवाचे

युध्द ...

युध्द ते विचारांचे आहे नाही ते मानवाचे 
मत भेद जिथे जन्म घेतो ते कारण आहे शत्रुत्वाचे।।

भले थोर सांगुन गेले सोडु नको नियतीचे धडे
समाजात जगतो गड्या तु नको पाडु रक्तांचे अंगणात सडे।।

आता झाले जाती धर्माचे  राजकारण सारे
सत्तेच्या सिंहासनावरती पिळतात एक मेकांचे गळे।। 

लोभ लालसा धनाची वाढली सारी 
तत्वांची मिटली रांगोळी सारी 
तरी माझे माझे म्हणत आले सारे
आपले ना ईथे आता उरले काही ।।

समाजाचे झाले राजकारण सारे ना घर सुटले
ना रस्ते विध्वंस माजला चौही कडे।। 

युध्द ते विचारांचे आहे नाही ते...........।। 

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe smitnit युध्द 

#Searching