जुळुनी येति बंध हे तेव्हा नात्यांनाही मिळतो नवा श्वास , एकमेकांच्या सोबतीने सुरू होतो आयुष्यभराचा अनमोल प्रवास ...!!!! श्वासानांही अर्थ देते दोन मनांची ही रेशीमगाठ , दोन जीवांच्या मनी रंगतो नव्या जीवनाचा नवा थाट.......!!! स्वर्ग ना पाहिला मी ना पाहण्याची मला ओढ मोठी , तुझ्या मिठीतच स्वर्ग अन् मिळाली स्वर्गाची अनुभूती .......!! हात तुझा हाती असावा पार करेन मी संसाराची प्रत्येक वादळवाट , श्वासानांही अर्थ देते दोन मनांची ही रेशीमगाठ........!! रेशीमगाठ