शाळेतली यारी, लय भारी वार्षिक परीक्षा म्हणजे जणूकाही वर्षाची शिक्षा वर्षाचा निकाल म्हणजे मुलांसाठी शाकाल मराठीच्या पेपरला, विद्यार्थ्यांची धमाल होते आणि इंग्लिश च्या पेपरला, विद्यार्थ्यांना रडू येते हिंदीचा पेपर म्हणजे, मार्कांचा दिवस "गणितात मी पास होऊ दे", पोरांचा नवस राज्यशास्त्राचा पेपर म्हणजे, पाठांतर मुलं म्हणतात "देवा आम्ही पास होऊ दे काठावर तर" विज्ञानाच्या पेपरची असते, मजाच न्यारी परीक्षा झाली, की तुटते, शाळेची यारी असं हे जीवन लय भारी शाळेतली यारी लय भारी #yarri