Nojoto: Largest Storytelling Platform

कळी होती आधी, नाही पाहिले तेव्हा कुणी कधी. फुल होत

कळी होती आधी,
नाही पाहिले तेव्हा कुणी कधी.
फुल होताच सर्वांना आकर्षून गेली,
नाही राहिली आता ती साधी कळी.
पाहताच हे सुंदर सुगंधित फुल,
सर्वांच्याच मनात भरले.
सुगंध ह्या फुलाचा इतका दरवळे,
फुलास ह्या आपले करण्या हात सरसावले.
आवडताच कित्येकांस हे फुल,
ठेविले काहींनी बागेत शोभा वाढावी म्हणून.
तर तोडले कित्येकांनी हे फुल,
आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून.
सजविले कित्येकांनी ह्यांस देवा चरणी,
तर कुस्करले कित्येकांनी ह्यांस स्वतःच्या पायांनी.
फुलाला ही वाटले आता,उगाच मिळाली मला ही संधी.
फुल होण्यापेक्षा बरी होती,जेव्हा मी कळी होती आधी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कळी होती आधी...
#कळीहोतीआधी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab
 #yqtaai
कळी होती आधी,
नाही पाहिले तेव्हा कुणी कधी.
फुल होताच सर्वांना आकर्षून गेली,
नाही राहिली आता ती साधी कळी.
पाहताच हे सुंदर सुगंधित फुल,
सर्वांच्याच मनात भरले.
सुगंध ह्या फुलाचा इतका दरवळे,
फुलास ह्या आपले करण्या हात सरसावले.
आवडताच कित्येकांस हे फुल,
ठेविले काहींनी बागेत शोभा वाढावी म्हणून.
तर तोडले कित्येकांनी हे फुल,
आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून.
सजविले कित्येकांनी ह्यांस देवा चरणी,
तर कुस्करले कित्येकांनी ह्यांस स्वतःच्या पायांनी.
फुलाला ही वाटले आता,उगाच मिळाली मला ही संधी.
फुल होण्यापेक्षा बरी होती,जेव्हा मी कळी होती आधी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कळी होती आधी...
#कळीहोतीआधी
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab
 #yqtaai