Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो , तेव्हा मनात

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो ,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो..

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो..

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो..

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो..

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा.सोलापूर 
✍🏻

©Smita Raju Dhonsale मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा
शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो ,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो..

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो..

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो..

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो,
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो..

स्मिता राजू ढोनसळे 
नान्नज, जिल्हा.सोलापूर 
✍🏻

©Smita Raju Dhonsale मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा