Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या

प्रेमासाठी..

तूला कायं वाटतं
मला नाही कळत
तुझ्या भावना
तुझ्या याचना..
सगळं कळतं..
तुझ्यापेक्षाही जास्त..
पण तूला हे माहित नाही..
नाही डावलू शकत 
आपण आपल्या भाग्याला..
प्रेम म्हणजे त्याग असतो
सर्वस्वाचा..
नुसत्या वल्गना करुन कायं उपयोग
हिंमत असेल तर राहून दाखवावे..
प्रेमापासून अलिप्त..
अगदी हाकेच्या अंतरावर असूनही
आलबेला ठेवावा लागतो..
मनातला गाभारा..
उजळून येण्यासाठी..
आणि करावी लागते सोबत
अंधाराची..
उजेड स्वतःहून नाकारण्यासाठी..
साधी गोष्ट हायं होयं प्रेम करणं..
हातात दीवा घेऊन..
फक्त चालायचं..
स्मरत..
प्रेमाला...
प्रेमासाठी.....

©Sangeeta Kalbhor
  प्रेमासाठी..

तूला कायं वाटतं
मला नाही कळत
तुझ्या भावना
तुझ्या याचना..
सगळं कळतं..
तुझ्यापेक्षाही जास्त..

प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. #शायरी

286 Views