Nojoto: Largest Storytelling Platform

अ भं ग ... लिहावे गा किती आणिक ते काय फाटक्यात प

अ भं ग ...

लिहावे गा किती 
आणिक ते काय
फाटक्यात पाय
स्थिती ऐसी||

जे काही लिहिले
कोणी ते वाचले
कळेनासे झाले
संभ्रमात||

वाचनाचे छंदी
आली तया मंदी
वेगळीच धुंदी
सद्य काळी||

घेऊन पुस्तक
कोणीही वाचेना
नवी विवंचना
आली भाळी||

सुधारला काळ
डिजिटल झाला
वाटतो हा घाला
फार मोठा||

मोबाईल हाती
तिथे नातीगोती
गुंतली ती मती
अखंडीत||

खंत जयरामा
होईल गा कसे
झाले वेडेपिसे
विश्व सारे||

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #mobileaddict
अ भं ग ...

लिहावे गा किती 
आणिक ते काय
फाटक्यात पाय
स्थिती ऐसी||

जे काही लिहिले
कोणी ते वाचले
कळेनासे झाले
संभ्रमात||

वाचनाचे छंदी
आली तया मंदी
वेगळीच धुंदी
सद्य काळी||

घेऊन पुस्तक
कोणीही वाचेना
नवी विवंचना
आली भाळी||

सुधारला काळ
डिजिटल झाला
वाटतो हा घाला
फार मोठा||

मोबाईल हाती
तिथे नातीगोती
गुंतली ती मती
अखंडीत||

खंत जयरामा
होईल गा कसे
झाले वेडेपिसे
विश्व सारे||

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #mobileaddict