Nojoto: Largest Storytelling Platform

नऊ मास जपलस मला जन्माला आल्यावर रस्त्याच्या कडेला

नऊ मास जपलस मला जन्माला आल्यावर रस्त्याच्या कडेला सहजच सोडलस मला ; नकोच होते मी मग हे सुंदर जग  का दाखवलस मला..
      नात्याच्या चौकटिचा खेळ मला कधी कळलाच नाही...कारण कुशीत घेउन झोपणारी आईच्या मायेची उब मी कधी पाहिलीच नाही..
   गोष्ट सांगणारा बाबा मला आठवतच नाही..
  भांंडणारी, हट्ट करणारी बहिण मला मिळालीच नाही...
  रंक्षाबंंधला राखी बांधायला माझ्या जवळ भाउच नाही...दादा म्हणून हाक मारेल अस एकहि हक्काच नात ऊरलच नाहि ...
  स्वप्नांचा बंंगला माझा खुप छान होता आणि अस्तित्वातला नजराणा मला अनाथ म्हणून हिणवत होता..न मागता मिळालेल प्रेम आणि माणुसकी या सगळ्यात मी घडत होते .
 सुंदर जग दाखवलस तु मला परीस्थिती नुसार मी जगायला शिकले..माणसाच्या गर्दीत आपल माणुस शोधत होते मनाचा पसारा स्वतंःच आवरत होते...शब्दाचा गुंता सोडवत होते अनाथ म्हणून जगायच नव्हत मला ...तुझ नाव माझ्या नावापुढे लावायच होत मला माझी स्वतः ची ओळख घडवायची होती मला 
   तुझ्या अंगणात भातुकलीचा डाव खेळायचा मला 
  सार काही राहुन गेल अनाथाच छत अंगावर आल..माझ्याच माणसानी मला परक केल ..
रक्ताच्या नात्यापेक्षा अनोळखी नात आपलस झाल..
 मनापासून  जुळलेली एक नाळ होती..आईच्या भेटिची ओढ होती 
सगळ काही आहे माझ्या जवळ तरीहि मनात मिलनाची आस होती ...मी एक अनाथ असल्याची जखम मनात खोलवर रुजली होती....
  
     -  ©पौर्णिमा गरुड  - 😊 मी एक अनाथ 🙃

😊 मी एक अनाथ 🙃