White #देहाशिवाय जगायचं आहे.. शब्दवेडा किशोर एकदा नियतीची चाकोरी मोडून मला मुक्तपणे जगायचं आहे एक शापीत जोकर ही माझी ओळख मोडून एक हसरा जोकर हे माझं नवं रूप साकारायचं आहे...... एकदा मनभरून खरं अन् एकहाती संपूर्णपणे माझं असणारं यश मला जगायचंय माझ्या फाटक्या दरिद्री नशिबाला एकदा तरी एका ग्रेट नशीबाच्या स्वरूपात बदललेलं मला बघायचं आहे...... खुप सारं अपयश अनुभवलंय अन् अजूनही अनुभवतोच आहे आता पुन्हा नव्याने नियतीशी तिनेच मांडलेला हा डाव आयुष्याचा खेळून निदान यावेळी तरी तो डाव मला जिंकायचा आहे यावेळी यशासाठी हा शेवटचा प्रयत्न करुन बघायचा आहे मात्र त्यातही अपयशच माझ्या पदरी पडलं तर नंतर मग मला या देहाबाहेर येऊन मज या देहाशिवाय जगायचं आहे...... ©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून