Nojoto: Largest Storytelling Platform

ये सखये परत फिरुनी तू कलत्या सांजवेळी वाट पाहती तु

ये सखये परत फिरुनी तू
कलत्या सांजवेळी
वाट पाहती तुझी बहरण्या
त्या अबोल पुष्पवेली.......

                  ठिबक चांदणे ओठावर
                  अनं गालावरती  खळी
                    पहाटेच्या दवातं न्हाली जणू
                   तू प्राजक्त पाकळी..........

   प्राजक्ताच्या देठा परी ओठ तुझे 
ते टेकविशी मम भाळी
तूझ्या चांदण्याच्या हाती घे भरुनी
माझ्या काळजातली शहाळी.........

                 शुक्राची चांदणी परी तू
              स्वप्नांच्या आभाळी
                     रात्रीच्या एकांती बहरलेली
                    तू धुंद अबोल प्रितकळी....
                                                  -राजाराम कंटे

©राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय
ये सखये परत फिरुनी तू
कलत्या सांजवेळी
वाट पाहती तुझी बहरण्या
त्या अबोल पुष्पवेली.......

                  ठिबक चांदणे ओठावर
                  अनं गालावरती  खळी
                    पहाटेच्या दवातं न्हाली जणू
                   तू प्राजक्त पाकळी..........

   प्राजक्ताच्या देठा परी ओठ तुझे 
ते टेकविशी मम भाळी
तूझ्या चांदण्याच्या हाती घे भरुनी
माझ्या काळजातली शहाळी.........

                 शुक्राची चांदणी परी तू
              स्वप्नांच्या आभाळी
                     रात्रीच्या एकांती बहरलेली
                    तू धुंद अबोल प्रितकळी....
                                                  -राजाराम कंटे

©राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय

जुनी सय नवं वलय #मराठीकविता