White जीवमात्र हे जन्मती इथे भोगण्या भोग देह मिळाला मानवी हा दुर्लभ संयोग कर्म करावे चांगले असो अंतरी भाव कधी नसावे अंतरी स्वार्थ अहंता हाव मानव होतो आंधळा स्वार्थ वाढता फार पूर्ण कराया वासना करतो मग अविचार अविचाराने नासते कृती वाढतो राग फणा काढुनी डोलतो मग द्वेषाचा नाग नको व्हायला वासना मनातल्या शिरजोर उपाय गेले सांगुनी संत महात्मे थोर अश्व मनाचा साधण्या जरा धिराने वाग प्रेम खरे घे जाणुनी कर थोडा तू त्याग ठेव मनी तू जागता अखंड भक्ती भाव अहंकार दे सोडुनी नको फुकाचा आव कृतज्ञतेची भावना मनी नेहमी ठेव ओळख आता माणसा अंतरातला देव ©जितू #rajdhani_night