Nojoto: Largest Storytelling Platform

सोडवावे तरी का गुंतून राही सखे मन का झाले हे इतके

सोडवावे तरी का गुंतून राही सखे
मन का झाले हे इतके प्रवाही सखे

आहे आधार मला त्या तूझ्या शब्दाचा
तू बोलली अजूनही जरी नाही सखे

होईल सुगंधी क्षण हे ही अपुले आता
घे तूही ओंजळीत फुलांना काही सखे

तू सावरणारी मला सोबती बस हवी
असो खडतर मार्ग कोणताही सखे

मी थांबेनही शेवटच्या श्वासापर्यंत
पण येशील तू मला दे ही ग्वाही सखे

जयंत वानखडे पण येशील तू.....
सोडवावे तरी का गुंतून राही सखे
मन का झाले हे इतके प्रवाही सखे

आहे आधार मला त्या तूझ्या शब्दाचा
तू बोलली अजूनही जरी नाही सखे

होईल सुगंधी क्षण हे ही अपुले आता
घे तूही ओंजळीत फुलांना काही सखे

तू सावरणारी मला सोबती बस हवी
असो खडतर मार्ग कोणताही सखे

मी थांबेनही शेवटच्या श्वासापर्यंत
पण येशील तू मला दे ही ग्वाही सखे

जयंत वानखडे पण येशील तू.....
jay4354888778149

jay

New Creator