Nojoto: Largest Storytelling Platform

तुला माझा इतका का बरे तिटकारा वाटला, एकच फोटो आपला

तुला माझा इतका का बरे तिटकारा वाटला,
एकच फोटो आपला तू डिलीट करून टाकला...

भेट ठरली होती त्या समुद्रापाशी शेवटची,
तुझी वाट पाहून आता तो समुद्र ही आटला...

एकटे किनाऱ्यावर बसून लिहिली तुझ्यावर कविता,
घरी येता येता पाहिले तर तो कागदही फाटला...

असा मग होत गेला डोळ्यांदेखत अंधार माझ्या,
उगवणाऱ्या रातीने माझ्या प्रेमाचा सूर्य झाकला...

आजकाल झुकवून असतेस म्हणे नजर त्याच्यासमोर,
पापण्यात असावा माझ्यासाठी एखादा अश्रू दाटला...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar #Sea