Nojoto: Largest Storytelling Platform

White "मतदान - लोकशाहीचा दीप" मतदान, लोकशाहीचा सन

White "मतदान - लोकशाहीचा दीप"

मतदान, लोकशाहीचा सन्मान, जागृत नागरिक, देशाची शान।
बजावा, मतदानाचा अधिकार, करा संविधानाचा, सण साकार॥

असंख्य समस्यांस, एक उत्तर, बोटचं ठेवा, आपल्या हक्कावर। 
विकास पथ हा, करू या सुदृढ, विकसित देश, इच्छा मनी दृढ॥

भ्रष्टाचारास हा, जोरात फटका, मार्ग प्रगतीचा, शोधू या नेटका। 
आधुनिक शिक्षण नि तंत्रज्ञान, संस्कृतीचा ही, जपू या स्वाभिमान॥

बळीराजास देऊ, दिन सुखाचे, हेच खरे, शिल्पकार भारताचे। 
योजनांचा आधार, देऊ त्यांना, मुक्त करुनीया, विश्व बाजारांना॥

स्त्री-पुरुष समान, घ्यावा हा वसा, सहभाग घेतं, उमटावा ठसा। 
जात-धर्म विसरा, द्या मूठमाती, मतदान हक्कचं, आपुल्या हाती॥

आवाज आपला, बुलंद करावा, लोकशाहीचाचं, आग्रह धरावा। 
माझा देशचं, हा माझा अभिमान, मतदान करू, बनवू महान॥

प्रत्येक मतास, असते महत्व, हेचं ते परिपक्व, देशाचं सत्व।
पूरी करू, आपण जबाबदारी, लोकशाहीत, जनता अधिकारी॥

निर्भय होऊन, करा मतदान, सुवर्णमय भविष्य, मागू दान।
देशसेवेसाठी, हा एकच मंत्र, मतदान करा, मिळूनी सर्वत्र॥

देशसेवा ही, आपली खरी पूजा, भारतीयता सदा, जपते प्रजा। 
लोकशाहीचा हा, दीप उजळावा, मतदानानेच, देश घडवावा॥

©Santosh Jangam
  #election लोकशाहीत मतदान हा नागरिकांचा महत्त्वपूर्ण हक्क आहे. प्रत्येकाने निर्भयपणे व जबाबदारीने मतदान करावे, कारण याच माध्यमातून देशाचा विकास आणि उज्ज्वल भविष्य निश्चित होते.

#election लोकशाहीत मतदान हा नागरिकांचा महत्त्वपूर्ण हक्क आहे. प्रत्येकाने निर्भयपणे व जबाबदारीने मतदान करावे, कारण याच माध्यमातून देशाचा विकास आणि उज्ज्वल भविष्य निश्चित होते. #मराठीकविता

99 Views