Nojoto: Largest Storytelling Platform

#मनाची बायको.... रथ प्रपंचाचा जणु असे दुचाकी स्वार

#मनाची बायको....
रथ प्रपंचाचा जणु असे दुचाकी स्वार तयावर नवरा बायको
मी जरासा आहे सांब भोळा अन् माझी ती बायको असे जराशी सायको
तीच देते शीतछाया ऊब देते सारखी तीच असे या मनीच्या मालकीची पालखी
सर्व सुखं मिळता और मिळावे फारसं काही ते नको

भरणपोषण काम आहे आज नवरोजी तुझे
व्यसन नसता सुख मनाला जीवनी शांती रुजे
वेसणाची दोर ही अवघड हाती ठेवते रे बायको

मदन आहे मी घराचा ती माझी रती अन् कामिनी
चाल आहे मंद माझी पण असे ती चपळ सौदामिनी
गाठ जन्मांची असावी नवस वदते बायको

वेल ही संसारी दिसे जी उगवली या जीवनी
वारसा माझा मिळाला अन् साथीला असे माझी संगिनी
नविन पिढीला सोपवे अधिकार सारे ती माझी बायको

मला सांगे सदा ती संकटावरी साऱ्या तु मात करतो सांज समयी तु मला साथ दे
सखा प्रीतराया तु माझा तुझा माझ्या हात हातात नित्य राहु दे
आर्जवे करते ती मनाने असे माझ्या मनाची बायको

@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #नाते_हृदयांतरीचे