Nojoto: Largest Storytelling Platform

Best नाते_हृदयांतरीचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नाते_हृदयांतरीचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Devanand Jadhav

नात्यांना खूप सुंदर आवाजाची 
आणि चेहऱ्याची गरज नसते, 
गरज असते ती सुंदर मनाची 
आणि अतूट विश्वासाची!

©Devanand Jadhav #नाते_हृदयांतरीचे...

शब्दवेडा किशोर

#मनाची बायको....
रथ प्रपंचाचा जणु असे दुचाकी स्वार तयावर नवरा बायको
मी जरासा आहे सांब भोळा अन् माझी ती बायको असे जराशी सायको
तीच देते शीतछाया ऊब देते सारखी तीच असे या मनीच्या मालकीची पालखी
सर्व सुखं मिळता और मिळावे फारसं काही ते नको
मी जरासा आहे सांब भोळा अन् माझी ती बायको असे जराशी सायको
भरणपोषण काम आहे आज नवरोजी तुझे
व्यसन नसता सुख मनाला जीवनी शांती रुजे
वेसणाची दोर ही अवघड हाती ठेवते रे बायको
मी जरासा आहे सांब भोळा अन् माझी ती बायको असे जराशी सायको
मदन आहे मी घराचा ती माझी रती अन् कामिनी
चाल आहे मंद माझी पण असे ती चपळ सौदामिनी
गाठ जन्मांची असावी नवस वदते बायको
मी जरासा आहे सांब भोळा अन् माझी ती बायको असे जराशी सायको
वेल ही संसारी दिसे जी उगवली या जीवनी
वारसा माझा मिळाला अन् साथीला असे माझी संगिनी
नविन पिढीला सोपवे अधिकार सारे ती माझी बायको
मी जरासा आहे सांब भोळा अन् माझी ती बायको असे जराशी सायको
मला सांगे सदा ती संकटावरी साऱ्या तु मात करतो सांज समयी तु मला साथ दे
सखा प्रीतराया तु माझा तुझा माझ्या हात हातात नित्य राहु दे
आर्जवे करते ती मनाने असे माझ्या मनाची बायको
मी जरासा आहे सांब भोळा अन् माझी ती बायको असे जराशी सायको
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #नाते_हृदयांतरीचे

शब्दवेडा किशोर

कुणी असे अनाहुतपणे जंतरमंतर हे केले ?
माझ्या या जगण्याचे अत्तर केले
मग तिला पाहता सर्व विसरलो
होते जितके मी पाठांतर केले
ती डोळ्यांनी बोलत गेली
मी नंतर भाषांतर केले
ती मौनातुनच बोलत राहीली
मी अंतर्मनाच्या शब्दवलयांकीत भाषेत
तिचे मौनाचे सुर ऐकले
तीने अलगद माझ्याशी स्वतःचे मन जुळवले
मी देखील मग तिच्याशी अलवार क्षणी
असलेले माझे हृदयांतर मिटवले
आली फुलपाखरासम माझ्या सप्तरंगी 
आयुष्यनभात अशी ती की मी स्वतःला
कठीण नियती असतानाही
सुवासीक जास्वंद बनवले

©शब्दवेडा किशोर #नाते_हृदयांतरीचे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile