Nojoto: Largest Storytelling Platform

लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो काम

लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो
काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो
लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी
दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो

जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो
रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती
सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच
याच सुखाच्या सपनात मी रमून जात होतो

दिस भराभर निघून उपाशीच घालवत होतो
कर्जाचा सावकार रोज उंबरठ्यावर पायत होतो
आज देतो उद्या देतो पैसा देऊ तरी कुठून 
आजचा दिवस फक्त उद्यावर टाकत होतो

जगाच्या नजरीतला काय त मग मी पोशिंदाच होतो
मायाच लेकरासाठी मी जवारी उधार मागत होतो
पैश्यापायी मले कोणी दे ना जवरी
आसवे पुसत मी माणसातला माणूस शोधत होतो #शेतकरी