Best शेतकरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शेतकरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशेतकरी शायरी मराठी, 'शेतकरी whatsapp status', शेतकरी कविता मराठी, शेतकरी आत्महत्या कविता, शेतकरी कविता,

  • 42 Followers
  • 42 Stories

शुभ पडघान

#leafbook

read more
देश माझा जगाचा अन्नदाता 
ही बाब ठरली आज खरी आहे...!!

अष्टोप्रहर खांद्यावरती भिस्त पेलत 
बांधावर उभा माझा शेतकरी आहे...!!

#शेतकरी दिन...!!

©शुभ पडघान #leafbook

Freelancer

Shankar Kamble

सूर्य कोपला आभाळी ओली लव्हाळी सुकली
जीव मातीचा कोरडा मान धाटाची वाकली

उर उमाशी घामाशी कशी सोसावी काहील?
आत बाहेर वणवा कधी सांगावा जाईल?

भासे सावली पारखी करू कुणाशी सलगी?
घुटमळे वावटळ फेर धरुनी कलगी

झाडां–झुडपांना कसा?भार पानांचा पेलेना
दूर लोटल्या खाईत दैन्य पाचोळा जाईना 

मोटं लागली उचकी तळ गाठला सुखाचा
पोटं हापाटी खिलारं ऐक हंबरा जीवाचा

हात निढळी ठेवून काळ्या ढगाला मागतो
सरो ताप दुनियेचा दिल्या वचना जागतो

©Shankar Kamble #Saffron #सूर्य #उन #ताप #गर्मी #उन्हाळा #उकाडा #विरह #शेतकरी #माती

Shankar Kamble

*तीन दगडांची चुल*
           *माय थापते भाकरी*
*निरपते डोळ्यातलं*
          *पाणी, सोसते बिचारी*

*माळ तुडविते सारा*
            *पाय रक्तानं माखलं*
*चोची भरविण्या घासं*
          *मोती उन्हांत वेचलं*

*आता कंबर बांधली*
              *घाव घाली नशिबाला*
*आज इथं ,उद्या तिथं*
             *कुठं विसावा पायाला?*

*किती जळते निखारे*
            *पदरात बांधलेले*
*धग कुणां ना लागते*
            *सारे लांडगे टपले*

*टोलेजंग इमारती*
         *आभाळाला त्या भिडल्या*
*धोंडा घेऊन उशाशी*
         *बेवारशी का निजल्या*?

*मूकपणे ती सोसते*
           *अशी झुंजते वाघीण*
*किती येवू दे वादळं*
            *जायी सामोरा आपणं*

©Shankar Kamble #SuperBloodMoon #आई #माय #कष्टकरी #कामगार #कष्ट #गरिबी #आई_भाकरी #शेतकरी #काम

Dharmendra Gopatwar

घाव ! 
Author_Dharmendra Gopatwar
 
आता कुठे हिरव्या देशाचा जन्म झाला होता ,
नुकतेच मान्यता मिळाली होती !
 पहिल्याच श्वासात रक्तपात झाला....

पुजीला मी ज्या रामाला त्याची दहा तोंडे झाली
जमिनीच्या पोटात आता कुठे सोन पेरल होत
रावणाने अतिवृष्टीच्या च्या रुपात उल्कापात केला .....
बघता बघता कसा हा खेळ झाला
मिठाने भरणारा घाव झाला
हिरव्या रानाच्या आस मागता 
काळाने हिरव्या देशाचा  वाळवंट केला , जीवनाचा जणू पोरखेळ झाला ...

सैनिकांसारखे पिक होती उभी पालवांची ढाल घेऊन 
आकाशातून वर्षेच्या उल्कापात झाली
 बळी राजाचा महिसासुराशी युद्ध सुरू झाला
  कित्येक सैनिक बळी गेले 
सैनिक काही झाले शहीद काही अंगावर घाव घेऊन आहेत उभी ...!

हिरव्या देशावर संकटांचा जणू महापूर आला.
बळी राजाचे राज्यावर त्याने ताबा केला 
पुरू राज्याचा रावण  सैन्य घेऊन
 पिकांवर रक्तपात करत समोर चालतच गेला
बळीराजाच्या राज्यावर हा ग्रहण कुठला लागला
रामाचा हार रावणाचा विजय 
हा युग कोणता कळेना ...

रामाचां झालेला हार ..सैन्याला  पचवेना , 
पुन्हा बळीराजाने सैन्य उभारले 
शंभराला सव्वासौ बराबर लढण्याचे त्या घावांने त्याला 
सिख देऊन गेले 
लढवय्ये पीक उभी आहेत , तय्यार युद्धाला !
आता ....

आधी राक्षसा पासून राज्य वाचविणे हा हेतू 
तर आता राज्य जिंकणे एवढं धेय्य ठेवून लढायची तयारी त्याने केला आहे
 त्याने पावसासाठी ..रामाला कडे आस नाही केला
रावणा सोबतच  उल्का पिंढा शी युध्दाचे तयारी त्याने केलेला आहे
रावणापसून बळीराजाच्या राज्य सोडवून  , पुन्हा एकदा स्वतंत्र हिरवं राज्य उभारण्याचे
धेय्य बळीराजाचे आहे !

युद्धासाठी आहेत उभी त्याची फौज
ढाल घेऊन पुन्हा खंबीर !

Youtube.com/कवी मन _मनातलं ओझं पानावर

©Dharmendra Gopatwar #घाव#शेतकरी

Asha...#anu

Sanika Gaikwad

शेतकरी

read more
#शेतकरी राजा 👑

तू लेक काळया मातीचा
मर्द रांगड्या छातीचा

पोशिंदा तू जगाचा 
मानकरी तू कामाचा

कष्ट नशिबी तुझ्या फक्त
 पेरायचंआणि काढायचं तू नुसत

घामाचं शून्य मोल तुझ्या 
बेभाव जातो माल
निसर्गाचा समतोल बिघडला 
की होतात तुझे हाल

अंधाऱ्या राती सोबतीला
 विंचव आणि साप
तरी दुसर्‍याच्या हाती
 तुझ्या किमतीच माप

सर्जा राजाची नादर गाडी 
तुझी वेगळाच थाट
राबतोस कळ्या आईसाठी म्हणूनच 
देशाचा कणा आहेत ताट

©Sanika Gaikwad शेतकरी

Shankar kamble

सुगी सराईचं दिस नाही इसावा पायाला माय माळ तुडविते                   चार मोत्याच्या दाण्याला..   
भर उन्हाचा काहूर भिजं घामानं पदर
 आग पोटात पेटली  चिल्या-पिल्याचा इचार...
  धाटं-धाटं जमवूनी भारा जोंधळ्याचा डोई लयी तापली ढेकळं भार संसाराचा वाही...
  काट्या-कुट्यात चालता देह -मनाला जखमां* 
  *घाली फुंकर स्वतःच चिंधी बांधते त्या कर्मा* ...
    अंग मोडूनियां काम नाही घडीचा आराम* 
   वात तीळ तीळ जळे दिव्यासंग ज्योत ठाम...* 
 *घोट पिऊनिया पाणी दूर सारते भुकेला* 
  शिळ्या तुकड्या संगती पचविते नशिबाला...* 
 सांज ढळता-ढळता रास सरली-सरली* 
 ऊत आला तुझ्या दारी झोळी अर्धी भरली...* 
   मोती झोळीत की डोळा    दोन्ही नाहीत येगळा* 
 * घास भरविते माय सारा अमृत सोहळा...*

©Shankar kamble #सुगीचे #रास #शेतकरी #🎑शेती #शेती 

#SunSet

Ashish Deshmukh

शेतकर्‍यांच्या नशीबी फुटके कौलं

अंधार दाटुन आलाय किमया काळ्या मेघांची...
आशांना मोहोर आलाय दुनिया वेड्या मनांची...
वर्षाविना आठवडा गेला फजिती पिवळ्या रानांची...
इंद्राला घ्यावी वाटली परीक्षा भोळ्या जनांची...

अचानक महापूर आला जळली कोवळी रोपं...
शेतकर्‍यांच्या माथी डोळी केवळ उघडी झोप...
हा महीनाभर चालला होता सृष्टीचा प्रकोप...
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आशा पावल्या लोप...

राबून दिवसभर तो गाळतोया घाम...
जागुन रातभर त्याचं चालतया काम...
मार्केटमध्ये बुद्धी तवा होतया जाम...
जवा मिठभाकरी पुरताच मिळतोया दाम...

सावकाराचे कर्ज मी आता कसे फेडू...
पुढचे पेरणे करायला दमडी कशी जोडू...
झाडाखाली एकटा फुंडसू-फुंडसू रडू...
की मन हलके करायला हंबरडा फोडू...

या उदासीन जीवनाचे आता काय करू...
परवडेल विष घ्यायला की फाशी लाऊन मरू...
संघर्षी जीवनाला का इतक्या लवकर हरू...
आयुष्याचे कौलं आपण पुन्हा एकदा फेरू...

©Ashish Deshmukh #farmer #Suicide #शेतकरी #किसान #किसानों 
#खेत #बारीश 
#farmersprotest

Shankar kamble

आल्या वळीवाच्या सरी
 माती न्हाती धुती झाली
 बीजं रुजलं काळजात
 सांज शहारून आली

 भेगाळल्या जीवा
 असं शिंपण सुखाचं
 माळ शिवारात फुलं
 आता सपान मोत्याचं

 वणव्यात वैशाखाच्या
 सुखं करपून गेलं
 करणी त्या परमेशाची
 डोळं नभाचं पाणावलं

 ठाई ठाई पांढरीत
 मेघराशी बरसल्या
 सुपाएवढं काळीज
 बळीराजा हरखला

 फुट मनाला अंकुर
 हात जोडी धरतीला
 सुखं पेरलं मातीत
 सारा भार देवा तुला

 ओटी भरली ओंजळ
 पिकं येवो मायंदळ
 सोन्या मोत्याची ही रास
 आता भरू दे हे खळ

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#शेतकरी 
#पेरणी
#शेती 
#वळीवाचापाऊस 
#धारा 
#पाणी_पाऊस_देगा_देवा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile