Nojoto: Largest Storytelling Platform

White सावळ्या रंगाची तेजकिरण तू जणू एक निळा मेघ तू

White सावळ्या रंगाची तेजकिरण तू
जणू एक निळा मेघ तू 
सजवले तुज मी माझ्या कृष्णकांतीने 
झाकोळले क्षितिज तुझ्या ओल्या बटांने  ||१||
आषाढाच्या  पावसाने केस ओले करुनी
चंद्र खुलतो तुझ्या मनोअंगणी
सखे हाक देतो तुजला
दे साद आवर्जूनी तू मजला 
अडकलोय मी तुझ्या नयनी     ||२|| 
आखली मी ही माझ्या प्रेमाची
अनमोल कृष्णरेघा तुझ्या जीवनी
अन् बनवले तुज माझी प्रीतलतीकांनी
फुललेली अशी हृदयसौदामिनी    ||३||
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #तू_आणि_मी
White सावळ्या रंगाची तेजकिरण तू
जणू एक निळा मेघ तू 
सजवले तुज मी माझ्या कृष्णकांतीने 
झाकोळले क्षितिज तुझ्या ओल्या बटांने  ||१||
आषाढाच्या  पावसाने केस ओले करुनी
चंद्र खुलतो तुझ्या मनोअंगणी
सखे हाक देतो तुजला
दे साद आवर्जूनी तू मजला 
अडकलोय मी तुझ्या नयनी     ||२|| 
आखली मी ही माझ्या प्रेमाची
अनमोल कृष्णरेघा तुझ्या जीवनी
अन् बनवले तुज माझी प्रीतलतीकांनी
फुललेली अशी हृदयसौदामिनी    ||३||
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #तू_आणि_मी