Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र ही रात्र तर सरु दे, बंद डोळ्यात तुला कैद तर

रात्र
ही रात्र तर सरु दे,
बंद डोळ्यात तुला कैद तर करू दे
आसवलेल्या स्वप्नांना पुन्हा बहर येऊ दे
दूर असूनही जवळ असण्याचा
भास मनी असाच राहू दे 
सर सकाळी तुला भेटण्याची 
आस मनी अवगत आहे बस,
फक्त ही रात्र सरु दे ।।
निद्रेला निद्रा येत नाही
बंद डोळ्यात स्वप्नांना थारा नाही
खऱ्या खुऱ्या आयुष्यात आपलंसं
काहीच नाही पण,
स्वप्नीक जीवनात तुझ्या नि माझ्या
प्रेमाला अंत नाही 
मनाचा ताबा मनावर नाही
तुला भेटनेच्या आशेत रात्र मात्र 
सरतच नाही,
आठवणींच्या वादळात मन अस गुंतून राहू दे
तुला भेटण्याची आस मनी अशीच रूजू दे
बस,
ही रात्र तर सरू दे ।।

©Pravin Gavhane चांदण्याची रात्र ही तर सरू दे

#VantinesDay
रात्र
ही रात्र तर सरु दे,
बंद डोळ्यात तुला कैद तर करू दे
आसवलेल्या स्वप्नांना पुन्हा बहर येऊ दे
दूर असूनही जवळ असण्याचा
भास मनी असाच राहू दे 
सर सकाळी तुला भेटण्याची 
आस मनी अवगत आहे बस,
फक्त ही रात्र सरु दे ।।
निद्रेला निद्रा येत नाही
बंद डोळ्यात स्वप्नांना थारा नाही
खऱ्या खुऱ्या आयुष्यात आपलंसं
काहीच नाही पण,
स्वप्नीक जीवनात तुझ्या नि माझ्या
प्रेमाला अंत नाही 
मनाचा ताबा मनावर नाही
तुला भेटनेच्या आशेत रात्र मात्र 
सरतच नाही,
आठवणींच्या वादळात मन अस गुंतून राहू दे
तुला भेटण्याची आस मनी अशीच रूजू दे
बस,
ही रात्र तर सरू दे ।।

©Pravin Gavhane चांदण्याची रात्र ही तर सरू दे

#VantinesDay