Nojoto: Largest Storytelling Platform

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली.कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.गुणांचं तोंड भरून कौतुक करते.अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. वडील असू देत,भाऊ असू देत,काका-मामा असू देत, मावश्या-आत्या असू देत; पण बहीण ती बहीण.हे सगळे मिळून एका रक्ताच्या बहिणीची जागा घेऊ शकत नाहीत.भावाची काळजी करणे,त्याच्या यशाने हरखून जाणे हे सगळे ती कोणी सांगायची वाट न पाहता स्वप्रेरणेने, मनापासून करीत असते. 
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या निमित्ताने खास माझ्या शैलीमधे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. sister bday #sister