Nojoto: Largest Storytelling Platform

ओल मनाची.. ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचि

ओल मनाची..

ओल मनाची सांगाया सांग मी काय करु
मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु

रुसून बसते मन माझे होते केविलवाणे
तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गाणे

असावास तूच एक ऐलतीरी अन् पैलतीरी
तुझ्यातचं दिसावा माझा तो सावळा हरी

दाखवून भाव का दिसतात कधी समजल्याविना
तुझा समजूतदारपणा माझ्या आयुष्याचा कणा

स्फुरत राहशील तू मला माझ्या शब्दाशब्दांतून
ओल मनाची सांगाया आलायं आता कंठही दाटून.....

मी माझी.....
07/03/2023

©Sangeeta Kalbhor
  #Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु
मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु

रुसून बसते मन माझे होते केविलवाणे
तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गाणे

असावास तूच एक ऐलतीरी अन् पैलतीरी
तुझ्यातचं दिसावा माझा तो सावळा हरी

#Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गाणे असावास तूच एक ऐलतीरी अन् पैलतीरी तुझ्यातचं दिसावा माझा तो सावळा हरी #शायरी

311 Views