सुखाची भोवळ आली, माणुसकी ढासळली असत्य पेरणी झाली, अहं जपी ll धृ ll मुलामुली भेदाभेद, अमंगळ जातीभेद अर्थाविणा कंठी वेद,निरर्थक ll1ll व्यवहारे नीतीमत्ता,अधिकारे गुणवत्ता पारदर्शी लोकसत्ता,वाट पाहेll2ll , सुकृत फळे गोमटी, वाढवुनी पुण्य गाठी जरी आली हाती काठी, राजे म्हणे ll3ll ©rajendrakumar bhosale #onlytruth #DearKanha