Nojoto: Largest Storytelling Platform

मनातील एक भाकर गं.... लहानपण कसे डोळ्यात भरलं गं आ

मनातील एक भाकर गं....
लहानपण कसे डोळ्यात भरलं गं
आठवणींच जग मनात सरलं गं
माझी माय मला त्यात दिसशी गं
राना शेतात ती राबती गं
एक भाकर खायला मिळती गं
पण किती दिवसभर ती पळती गं 
भाकर दिसती आपणास एवढी गं
त्या पाठीमागे कष्ट सारं खूप गं 
पहाटे उठून पीठ दळती गं 
मग मुलांसाठी भाकर माय करती गं
भाकर करताना गाली हळूच हसती गं
मनी विचार आला कसं हिला जमतं गं 
पीठ काटवटीत घेती गं
गरम पाण्याचा चटका हाती सोसती गं 
मनी नाही कसली तिच्या भीती गं
थापलेली भाकर जाते तव्यावर गं
टम्म टम्म फुगू लागते भाकर गं
टम्म फुगलेल्या भाकर मध्ये भरती मायेचा ओलावा गं
अशी वेगळी भाकर मनात घर करून राहिली गं
अशी भाकर नाही बघायला परत त्या मायेच्या स्पर्शाची गं
जपून राहिल्या त्या आठवणी हृदयात गं

©Mayuri Bhosale मनातील एक भाकर ग
मनातील एक भाकर गं....
लहानपण कसे डोळ्यात भरलं गं
आठवणींच जग मनात सरलं गं
माझी माय मला त्यात दिसशी गं
राना शेतात ती राबती गं
एक भाकर खायला मिळती गं
पण किती दिवसभर ती पळती गं 
भाकर दिसती आपणास एवढी गं
त्या पाठीमागे कष्ट सारं खूप गं 
पहाटे उठून पीठ दळती गं 
मग मुलांसाठी भाकर माय करती गं
भाकर करताना गाली हळूच हसती गं
मनी विचार आला कसं हिला जमतं गं 
पीठ काटवटीत घेती गं
गरम पाण्याचा चटका हाती सोसती गं 
मनी नाही कसली तिच्या भीती गं
थापलेली भाकर जाते तव्यावर गं
टम्म टम्म फुगू लागते भाकर गं
टम्म फुगलेल्या भाकर मध्ये भरती मायेचा ओलावा गं
अशी वेगळी भाकर मनात घर करून राहिली गं
अशी भाकर नाही बघायला परत त्या मायेच्या स्पर्शाची गं
जपून राहिल्या त्या आठवणी हृदयात गं

©Mayuri Bhosale मनातील एक भाकर ग