Nojoto: Largest Storytelling Platform

भुकेने व्याकुळ होवुन झाली तिची तळमळ, तेवढ्यात दिले

भुकेने व्याकुळ होवुन झाली तिची तळमळ,
तेवढ्यात दिले तिला कोणी आणुनी ते फळ...

फळ ते बघताच तृप्त मन तिचे झाले,
मनोमन तिने मानवाचे आभार मानले...

फळामध्ये होत त्या बारुद नावाच विष,
पाण्यामध्ये उभी तिने बुडवलं निज शीष...

पोटात तिच्या वाढत होता इवलासा तो गर्भ,
माहीत नव्हतं तिला देणारा आहे मानवरुपी सर्प...

उभी होती वाहणाऱ्या नदीत एकांतात ती,
करत होती विचार काय गुन्हा केला मी ?

घेतली तिने तिथेच गर्भासोबत जलसमाधी,
कळून चुकली तिला मानवाची गहाण बुध्दि...

तिच्या मनातील भावना ता कोणास नाही कळल्या,
तिच्या अश्रुधुरा सुद्धा पाण्यासोबत वाहुन गेल्या!!!

- मंगेश काणकोणकर. मदत कि चेष्टा
भुकेने व्याकुळ होवुन झाली तिची तळमळ,
तेवढ्यात दिले तिला कोणी आणुनी ते फळ...

फळ ते बघताच तृप्त मन तिचे झाले,
मनोमन तिने मानवाचे आभार मानले...

फळामध्ये होत त्या बारुद नावाच विष,
पाण्यामध्ये उभी तिने बुडवलं निज शीष...

पोटात तिच्या वाढत होता इवलासा तो गर्भ,
माहीत नव्हतं तिला देणारा आहे मानवरुपी सर्प...

उभी होती वाहणाऱ्या नदीत एकांतात ती,
करत होती विचार काय गुन्हा केला मी ?

घेतली तिने तिथेच गर्भासोबत जलसमाधी,
कळून चुकली तिला मानवाची गहाण बुध्दि...

तिच्या मनातील भावना ता कोणास नाही कळल्या,
तिच्या अश्रुधुरा सुद्धा पाण्यासोबत वाहुन गेल्या!!!

- मंगेश काणकोणकर. मदत कि चेष्टा

मदत कि चेष्टा