Nojoto: Largest Storytelling Platform

मी व्याकुळ होतो आणि तू गावी मनात गाणी. मेघमल्हार

मी व्याकुळ होतो आणि 
तू गावी मनात गाणी.
मेघमल्हार आळवुनी
नभाचे गळावे पाणी.

ही मैफिल उदास वाटे
स्वर भैरवीचेच जणू भासे,
गायनाती राग रागिणि
मजवरी का ती ना हसे...

ह्या ढिल्या गळ्यावरी
लागे ना पंचम गहिरा,
डोलू दे तूज स्वरावरी
सळसळणारा बहिरा.

मज सामर्थ्याच्या स्वरा
तूज व्यंजनाची जोड,
गातेस जे हृदयअंतरीत
त्याचेच मौन तू सोड.

आर्तता हृदयातील ह्या
गीतातुनी आळवावी,
मज कंठीची व्याकुळता
तूज स्वरातं जिरवावी.

          *'''''''''''''''''अजित* मनस्वी
मी व्याकुळ होतो आणि 
तू गावी मनात गाणी.
मेघमल्हार आळवुनी
नभाचे गळावे पाणी.

ही मैफिल उदास वाटे
स्वर भैरवीचेच जणू भासे,
गायनाती राग रागिणि
मजवरी का ती ना हसे...

ह्या ढिल्या गळ्यावरी
लागे ना पंचम गहिरा,
डोलू दे तूज स्वरावरी
सळसळणारा बहिरा.

मज सामर्थ्याच्या स्वरा
तूज व्यंजनाची जोड,
गातेस जे हृदयअंतरीत
त्याचेच मौन तू सोड.

आर्तता हृदयातील ह्या
गीतातुनी आळवावी,
मज कंठीची व्याकुळता
तूज स्वरातं जिरवावी.

          *'''''''''''''''''अजित* मनस्वी
ajitjadhav8543

Ajit Jadhav

New Creator

मनस्वी #poem