Nojoto: Largest Storytelling Platform

ध्यास... महामानवांच्या मनीचा तो एकच होता ध्यास. म

ध्यास...

महामानवांच्या मनीचा
तो एकच होता ध्यास.
म्हणूनी घडला या देशात
त्याच्या नावाने इतिहास..

माणसाला माणसात आणणे
हीच होती त्यांच्या उरी आस.
स्वराज्यासारखे ध्येय धरूनी 
एकत्र केलं त्या सर्व मानवांस..

लेखणीने त्यांनी सोपे केले 
असह्य अशा  या जीवनास..
झाली राज्य घटनेने सुरुवात तेव्हा
प्रत्येकाचे नवीन आयुष्य जगण्यास.

नभीचा तो नव क्रांती सुर्य जाहला
असे कोटी कोटी प्रणाम त्याच्या कार्यास.
अशा विश्ववंदनीय डाॅ.बाबासाहेबांकडूनही शिकावा
माणसाने जीवन जगण्याचा नवा ध्यास.

कवी-  सचिन झंजे
         कोल्हापूर... ध्यास....
ध्यास...

महामानवांच्या मनीचा
तो एकच होता ध्यास.
म्हणूनी घडला या देशात
त्याच्या नावाने इतिहास..

माणसाला माणसात आणणे
हीच होती त्यांच्या उरी आस.
स्वराज्यासारखे ध्येय धरूनी 
एकत्र केलं त्या सर्व मानवांस..

लेखणीने त्यांनी सोपे केले 
असह्य अशा  या जीवनास..
झाली राज्य घटनेने सुरुवात तेव्हा
प्रत्येकाचे नवीन आयुष्य जगण्यास.

नभीचा तो नव क्रांती सुर्य जाहला
असे कोटी कोटी प्रणाम त्याच्या कार्यास.
अशा विश्ववंदनीय डाॅ.बाबासाहेबांकडूनही शिकावा
माणसाने जीवन जगण्याचा नवा ध्यास.

कवी-  सचिन झंजे
         कोल्हापूर... ध्यास....
sachinzanje6376

Sachin Zanje

New Creator