White देव्हाऱ्यातल्या दिव्याने देवाला हळूच हाक दिली आणि विचारलं. देवा माझ्या वाचून तुझ्या देव्हाऱ्यात का अंधार असतो सर्वत्र ? तु स्वतः एवढा तेजोमय आहे, तर तुला माझ्या प्रकाशाची गरज का भासते ? देव हसत हसत त्या दिव्याला म्हणाला, माझा प्रकाश हे ब्रह्मांड प्रकाशमय करेल तर तुझ्या प्रकाशाला सुद्धा किंमत असावी म्हणून तु माझ्या देव्हाऱ्यात उजेड पसरवतोय... ©मयुर लवटे #Ganesh_chaturthi motivational thoughts in marathi #Life #Quote #Love #God #lord #GaneshChaturthi