Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला, पण कधी कोणाचे वाहते अ

जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी कोणाचे वाहते अश्रू पुसण्याचा मोह झाला,
तर कधी कोणाच्या निरागस हास्यात मन गुंतले....
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी जबाबदारीने पाऊल थांबवले,
तर कधी सुखद गोड स्वप्न पडले...
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी मन अनोळखी सुगंधात गुंतले,
तर कधी अनोळखी स्पर्शाने गुंतले...
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी मन तुझ्यात गुंतले,
तर कधी तुझ्या आठवणीत ,
फक्त तुझ्या आठवणीत गुंतले..... तुझ्या आठवणीत
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी कोणाचे वाहते अश्रू पुसण्याचा मोह झाला,
तर कधी कोणाच्या निरागस हास्यात मन गुंतले....
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी जबाबदारीने पाऊल थांबवले,
तर कधी सुखद गोड स्वप्न पडले...
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी मन अनोळखी सुगंधात गुंतले,
तर कधी अनोळखी स्पर्शाने गुंतले...
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी मन तुझ्यात गुंतले,
तर कधी तुझ्या आठवणीत ,
फक्त तुझ्या आठवणीत गुंतले..... तुझ्या आठवणीत