Nojoto: Largest Storytelling Platform

भगवंता.... मी जशी नाही तशी का वागू लागलेयं शांत ,

भगवंता....
मी जशी नाही तशी का वागू लागलेयं
शांत , समाधानी स्वभाव आहे माझा..
जास्तची अपेक्षा नाही मला...
पण भगवंता...
जे असेल ते परफेक्ट असावे असे वाटते..
म्हणजे मनाचे समाधान आणि सुख मला 
जास्त प्रिय आहे हो..
मुलांनी मुलांसारखे वाइले ,राहिले की नाही वाटत चिंता..
त्यांच्या सुखापेक्षा का माझे सुख वेगळे आहे...
पण ना स्वामी..
हे कळतचं नाही हो मुलांना...
अभ्यास करायचा सोडून सतत मोबाईलमध्ये असतात..सांगितले तरी मनावर नाहीत घेत..आणि मग चिडचिड होते..
काळजी वाटते कमालीची..
जीव रडकुंडीला येतो..
घाबराघुबरा होतो...
विचारांवर नियंत्रण नाही रहत..शब्दांवरही
नियंत्रण नाही राहत...
तोल जातोचं नाही म्हंटले तरी..
आणि मग आतल्याआत मन उदास होतं
नाही वाटत काहीही बरं..
आपलचं चुकलयं असं वाटून
अपराधी बोध निर्माण होतो...
कायं करु सांगा ना स्वामी....
कसं आणू ते मन समाधानातं..
सगळं दिलेयं हो तुम्ही...
काहीचं कमी नाही...
शोधून ही सापडणार नाही काही उणं..
तरीही डोळे पाणवतात..आणि
धावा घ्यावा वाटतो तुमच्याकडे..
मला सांभाळा स्वामी...
माझ्यात तो निवांतपणा आणा..
मनःशांती लाभू द्या..
शेवटी तुम्हीच सगळे करणार आहात..
तरीही स्वामी..आई आहे ना मी..
नाही धीर धरवत हो..
तुमच्या इतका.....

मी माझी.....
12/05/2023

©Sangeeta Kalbhor
  भगवंता....
मी जशी नाही तशी का वागू लागलेयं
शांत , समाधानी स्वभाव आहे माझा..
जास्तची अपेक्षा नाही मला...
पण भगवंता...
जे असेल ते परफेक्ट असावे असे वाटते..
म्हणजे मनाचे समाधान आणि सुख मला 
जास्त प्रिय आहे हो..

भगवंता.... मी जशी नाही तशी का वागू लागलेयं शांत , समाधानी स्वभाव आहे माझा.. जास्तची अपेक्षा नाही मला... पण भगवंता... जे असेल ते परफेक्ट असावे असे वाटते.. म्हणजे मनाचे समाधान आणि सुख मला जास्त प्रिय आहे हो.. #शायरी

211 Views