आपुला अभिमान मराठी आपुली जान मराठी. बोलण्यात शान मराठी आपुला मान सन्मान मराठी. प्रेमाची खाण मराठी जीव की प्राण मराठी. जगतो तो श्वास मराठी लेखणीचा विश्वास मराठी. लेखकानों💕 शुभ प्रभात सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.