Nojoto: Largest Storytelling Platform

*(हजल)* *वृत्त --स्त्रग्विणी* *लगावली*-- *गालगा

*(हजल)*

*वृत्त --स्त्रग्विणी*

*लगावली*--
*गालगा गालगा गालगा गालगा

*तोफखान्यापरी वाटते बायको*
*भांडताना अशी तापते बायको* 

*ठेवले मौन मी सांगतो कारणे*
*शांत झालो तरी पेटते बायको*

*नाव तर वैभवी  केवढे चांगले*
*तोंड पाडून का वागते बायको*

*राग येतो तिला गाल वाटे फुगा*
*प्रेम माझ्यावरी सांगते बायको*

*राग नाकावरी आत ज्वालामुखी*
*वादळी शांतता ठेवते बायको*

*आज माहेरला चालले सांगते* 
*धाक ठेउन का राहते बायको*

*रोज आहे तिची नवनवी मागणी* 
*फार माझा खिसा फाडते बायको*

*खर्च करण्यास मज रोकडा मागते*
*प्रेमजाळे असे फेकते बायको*

*राहतो मी मुका झोपही काढतो*
*वाद मी जिंकले सांगते बायको*

©Smita Raju Dhonsale *(हजल)*

*वृत्त --स्त्रग्विणी*

*लगावली*--
*गालगा गालगा गालगा गालगा*

*तोफखान्यापरी वाटते बायको*
*(हजल)*

*वृत्त --स्त्रग्विणी*

*लगावली*--
*गालगा गालगा गालगा गालगा

*तोफखान्यापरी वाटते बायको*
*भांडताना अशी तापते बायको* 

*ठेवले मौन मी सांगतो कारणे*
*शांत झालो तरी पेटते बायको*

*नाव तर वैभवी  केवढे चांगले*
*तोंड पाडून का वागते बायको*

*राग येतो तिला गाल वाटे फुगा*
*प्रेम माझ्यावरी सांगते बायको*

*राग नाकावरी आत ज्वालामुखी*
*वादळी शांतता ठेवते बायको*

*आज माहेरला चालले सांगते* 
*धाक ठेउन का राहते बायको*

*रोज आहे तिची नवनवी मागणी* 
*फार माझा खिसा फाडते बायको*

*खर्च करण्यास मज रोकडा मागते*
*प्रेमजाळे असे फेकते बायको*

*राहतो मी मुका झोपही काढतो*
*वाद मी जिंकले सांगते बायको*

©Smita Raju Dhonsale *(हजल)*

*वृत्त --स्त्रग्विणी*

*लगावली*--
*गालगा गालगा गालगा गालगा*

*तोफखान्यापरी वाटते बायको*