Nojoto: Largest Storytelling Platform

White आयुष्य... आयुष्य चालले सारे निसटूनी रिकामा ख

White आयुष्य...
आयुष्य चालले सारे निसटूनी
रिकामा खिसा भरण्यासाठी 
रात्र दिवस ही समजेना 
वेळ राहिला फक्त धावण्यासाठी 
गुंफूनी घेतले आयुष्य 
सुखात जीवन घालवण्यासाठी 
हरवून बसलो आहोत नाती 
चार मोहाच्या क्षणांसाठी 
 हसणे सुद्धा विसरले 
किंमत होऊनी गेली त्याची शून्य लोकांसाठी 
नात्यागोत्याची तर परवाच नाही 
जोडली फक्त मुळी त्या स्वार्थासाठी 
सामावले जवळच आयुष्याचे गुपित 
निकट असले तरी गप्प राहण्यासाठी 
कुणालाच इथे कुणाची पडली नाही 
स्पर्धा सुरू झाली फक्त जिंकण्यासाठी 
जो तो धावत आहे सुखासाठी 
सारीपाटाचा डाव सारा मांडला 
कोडेच पडले एक जगण्यासाठी......

©Mayuri Bhosale आयुष्य
White आयुष्य...
आयुष्य चालले सारे निसटूनी
रिकामा खिसा भरण्यासाठी 
रात्र दिवस ही समजेना 
वेळ राहिला फक्त धावण्यासाठी 
गुंफूनी घेतले आयुष्य 
सुखात जीवन घालवण्यासाठी 
हरवून बसलो आहोत नाती 
चार मोहाच्या क्षणांसाठी 
 हसणे सुद्धा विसरले 
किंमत होऊनी गेली त्याची शून्य लोकांसाठी 
नात्यागोत्याची तर परवाच नाही 
जोडली फक्त मुळी त्या स्वार्थासाठी 
सामावले जवळच आयुष्याचे गुपित 
निकट असले तरी गप्प राहण्यासाठी 
कुणालाच इथे कुणाची पडली नाही 
स्पर्धा सुरू झाली फक्त जिंकण्यासाठी 
जो तो धावत आहे सुखासाठी 
सारीपाटाचा डाव सारा मांडला 
कोडेच पडले एक जगण्यासाठी......

©Mayuri Bhosale आयुष्य