Nojoto: Largest Storytelling Platform

नित्य काव्यबत्तीशी - ७ आई तुझ्या स्वागता सजले बघ

नित्य काव्यबत्तीशी - ७

आई तुझ्या स्वागता
सजले बघ हे तबक...
सुखा समाधानाची
रांगोळी काढली सुबक...

उत्साहाचे सर्वत्र
प्रफुल्लीत वातावरण...
तुझ्या भेटीसाठी हे
अधीर झाले तन-मन... 

नवधान्य मिश्रित
ही शेतातील मऊ माती...
सौख्याचा घट बसे,
जागरात मने नहाती...

आई तुझा महिमा
अगाध त्यासी न गं तोड...
भोळे भाविक आम्ही
पूजा मानून घे गं गोड...

सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे
१७/१०/२०, शनिवार.

 नवरात्र
नित्य काव्यबत्तीशी - ७

आई तुझ्या स्वागता
सजले बघ हे तबक...
सुखा समाधानाची
रांगोळी काढली सुबक...

उत्साहाचे सर्वत्र
प्रफुल्लीत वातावरण...
तुझ्या भेटीसाठी हे
अधीर झाले तन-मन... 

नवधान्य मिश्रित
ही शेतातील मऊ माती...
सौख्याचा घट बसे,
जागरात मने नहाती...

आई तुझा महिमा
अगाध त्यासी न गं तोड...
भोळे भाविक आम्ही
पूजा मानून घे गं गोड...

सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे
१७/१०/२०, शनिवार.

 नवरात्र