Nojoto: Largest Storytelling Platform
ashwinimengane0658
  • 138Stories
  • 234Followers
  • 717Love
    396Views

Ashwini Mengane

  • Popular
  • Latest
  • Video
c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

प्रेम वरवर का कळेना खोल नाही
जा कुठेही भावनेला मोल नाही


सौ. अश्विनी श्रीहरी मेंगाणे

©Ashwini Mengane

47 Views

c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

जीवनाचा प्रवास
एकट्याने करायचा...
सोबतीला हात
एकांताचा धरायचा...

सौ. अश्विनी श्रीहरी मेंगाणे

©Ashwini Mengane #lonely एकांत...

#lonely एकांत...

17 Love

c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

*कोजागिरी...वर्णसंख्या - ७/९/७/९*

कोजागिरीचा चंद्र
शारद चांदण रातीला... 
मधाळ,सुंदरसे 
लावण्य असे संगतीला...१

केशर, बदामाने
सजले दुधाचे हे पात्र...
पौर्णिमेच्या चंद्रास 
घेऊन आली ही रात्र...२

को जागती म्हणत
लक्ष्मी येते सर्वांच्या घरी...
आशिर्वाद रूपाने 
देते छान सुखाच्या सरी...३

पौर्णिमेच्या रात्रीचा
असामंद मंद प्रकाश...
या वातावरणात
तारकांनी भरे आकाश...४

गच्चीवर जमुया,
कोजागिरी करू साजरी...
मसालेदार दुध
आज सारे करूया घरी...५

©Ashwini Mengane #Happy
c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

सखे आजही आहे 
रस्ता तोच जुना...
ज्यावरी उमटल्या
तुझ्या पाऊलखुणा...

आश्विनी श्रीहरी मेंगाणे

©Ashwini Mengane #रस्ता
c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

आई महती
सारे पाहती
भक्तीभावाने 
फुले वाहती...

सौख्याची आली
बसे महाली
सर्वांची आई
ही महाकाली...

वर्णू मी काय
अंबा ही माय
जोगवा गाते
येई पहाय...

भोळी मी बाई
करते घाई
दर्शन देण्या
तू ये गं आई...

मांडला पाट
घातला घाट
पुरणपोळी
सजले ताट...

रुप सुंदर
भक्ती सागर
तुझा घालतो
आम्ही जागर

हे नवरंग
मन तरंग
भक्तीभावाने
लागला संग... #n#देवीavratri2020
c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

नित्य काव्यबत्तीशी - ७

आई तुझ्या स्वागता
सजले बघ हे तबक...
सुखा समाधानाची
रांगोळी काढली सुबक...

उत्साहाचे सर्वत्र
प्रफुल्लीत वातावरण...
तुझ्या भेटीसाठी हे
अधीर झाले तन-मन... 

नवधान्य मिश्रित
ही शेतातील मऊ माती...
सौख्याचा घट बसे,
जागरात मने नहाती...

आई तुझा महिमा
अगाध त्यासी न गं तोड...
भोळे भाविक आम्ही
पूजा मानून घे गं गोड...

सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे
१७/१०/२०, शनिवार.

 नवरात्र

नवरात्र #poem

12 Love

c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

नको वाटतो हा गोंधळ
हवी मजला शांतता...
मन सैरभर झाले सारे
हवी मजला एकांतता...

कोपरा शोधतो असा
जिथे असेल शांत...
साऱ्या चिंताची एका 
क्षणात पडेल भ्रांत...

राहू द्या हो एकटे
नका ना इतके छळू...
संयमही माझा आता
 लागला आहे गळू...

*सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे* नको

#lost

नको #lost #poem

11 Love

c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

पक्षी निघाले...

पक्षी निघाले...

84 Views

c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

*पंचाक्षरी काव्यरचना...साजन भारी*

आली हो स्वारी
साजण भारी
नटूनी आले
स्वागता दारी...

दोन स्पंदने
चंचल मने
बोलत होती
फक्त नयने...

वाटे आभास
जीवा या आस
लागला तिला
त्याचाच ध्यास...

मन अधीर
धरे ना धीर
भेटीसाठी हे
होते बधीर...

सखी अर्पण
प्रेम दर्पण
प्रेमात करी
हे समर्पण...

मिटे दुरावा
प्रेम पुरावा
विरह आता
कसा उरावा...

पडली भ्रांत
प्रेमात शांत
दोघेही घेती
हृदय प्रांत...

सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे.
११/९/२०, शुक्रवार. साजण

#raindrops

साजण #raindrops

13 Love

c8c7620bdd6208b1697a37bb5ffb95d9

Ashwini Mengane

विडंबन

विडंबन

138 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile