White #मन नाजूक नाजूक मन नाजूक नाजूक जैसे तूप ते साजूक बरवा तोच साधक न दुखवी कुणा एक.... मन भावूक भावूक आहे सर्वांना ठाऊक येई कठोर शब्द एक भंगते ते क्षणा एक.... मन गढूळ गढूळ परनिंदेचा तो मळ मन खट्याळ खट्याळ ढवळीते निंदा गाळ.... मन मवाळ मवाळ नाम घेता ये जवळ मन प्रेमळ प्रेमळ नामाची ओढता माळ.... ©शब्दवेडा किशोर #मनातलंमाझ्या