#विशालाक्षर एक दिवा फडफडू लागतो तेव्हा दुसऱ्याने वात पणाला लावून तेवून राहायला हवं कधी कधी शांततेचंही वादळ हलवून टाकेल दोघांमधला पूल कधी कधी प्रकाशाचा भयंकर झोत दिपवून टाकेल नुसतं असणंही.. अशावेळी.. घनदाट क्षणांतून वेचायला हवा जादुई आभास.. आणि मंद अशा प्रकाशाला प्रसवत न्हाऊन घालावं आपल्या माणसाला.. अंधाराची माती उरात पेरून पोहोचवायला हवा प्रेमाचा कोवळासा कोंभ.. वातीपासून मनापर्यंत... ©Vishal Potdar