Nojoto: Largest Storytelling Platform

White #मी वाडा बोलतोय.... शब्दवेडा किशोर कधी काळी

White #मी वाडा बोलतोय....
शब्दवेडा किशोर
कधी काळी माझ्या पोटात
मी माझ्या वास्तुपुरुषाच्या अनेक पिढ्यांना जपलंय
त्यांच्या सुखातंच माझं सुख मी मोठ्या आनंदानं शोधलंय
त्यांच्या वर सदा सुखाची छाया मी धरली
त्यांच्या चेहर्‍यावर हसु सतत फुललेलं राहावं म्हणून नियतीच्या उनपावसाची झळ कायम मी सोसली
काळ बदलला अन् कुठून कशी या गावात आधुनिकता येऊन तिची माझ्या अस्तित्वाला नजर लागली
नियतीने अजब खेळी खेळली अन् अनाहूतपणे इथल्या संस्काराची गाठोडी विरली जाऊन ती सुद्धा माझ्यागत अडगळीत जमा झाली
आता जुन्या दिवसाचे क्षण आठवत मी माझा
श्वासरथ कसाबसा हाकतो आहे
अन् या अंगणी पुन्हा नव्याने भरेल का माझ्या
निरागस पाखरांची शाळा याचीच वाट मी पाहतो आहे

©शब्दवेडा किशोर #अस्तित्वाचाशोध