Nojoto: Largest Storytelling Platform

तू आणि मी आपण दोघांनी अगदी खुशीत असावं....., तुझ्य

तू आणि मी आपण दोघांनी
अगदी खुशीत असावं.....,
तुझ्या अशांत मनानं
हळूच माझ्या कुशीत शिरावं........!

तुझ्या रागाला राजा 
प्रेमानं मी बिलगावं.....,
रुसलेल्या तुझ्या मनाला 
मी माझ्या हास्याने फुलवावं.......!

माझ्या त्राग्याला राजा तू
हळुवार फुंकर मारून विझवावं....,
खचलेल्या माझ्या मनाला
तुझ्या प्रेमानं भिजवावं.......!

तुझ्या मनातील स्वप्ने राजा
मी उघड्या डोळ्यांनी पाहावीत .....,
साऱ्या आशा आकांशा 
सुखासमाधाना सोबत रहावीत.......!

जगण्याच्या शर्यतीत धावून
कसं दोघांनी थकावं....,
घराच्या प्रेमाच्या भिंतीना
शांत मनाने टेकावं.......!

तुझ्या माझ्या उत्साहाने
छोटंसं घर आपल सजावं....,
मनामनातलं अंतर 
स्नेहाने भरावं........! Tu ani mi
तू आणि मी आपण दोघांनी
अगदी खुशीत असावं.....,
तुझ्या अशांत मनानं
हळूच माझ्या कुशीत शिरावं........!

तुझ्या रागाला राजा 
प्रेमानं मी बिलगावं.....,
रुसलेल्या तुझ्या मनाला 
मी माझ्या हास्याने फुलवावं.......!

माझ्या त्राग्याला राजा तू
हळुवार फुंकर मारून विझवावं....,
खचलेल्या माझ्या मनाला
तुझ्या प्रेमानं भिजवावं.......!

तुझ्या मनातील स्वप्ने राजा
मी उघड्या डोळ्यांनी पाहावीत .....,
साऱ्या आशा आकांशा 
सुखासमाधाना सोबत रहावीत.......!

जगण्याच्या शर्यतीत धावून
कसं दोघांनी थकावं....,
घराच्या प्रेमाच्या भिंतीना
शांत मनाने टेकावं.......!

तुझ्या माझ्या उत्साहाने
छोटंसं घर आपल सजावं....,
मनामनातलं अंतर 
स्नेहाने भरावं........! Tu ani mi
priyatambde4225

Priya Tambde

New Creator