Nojoto: Largest Storytelling Platform

सर, शासकीय सेवेचा पहिला दिवस आज ही आठवत असेल तुम्ह

सर, शासकीय सेवेचा पहिला दिवस
आज ही आठवत असेल तुम्हाला
तसाच सेवनिवृत्तीचा आजचा हा दिवस
गोड- कटू अनुभवांना देईल उजाळा

सुरुवातीचे दिवस सेवेत रूळताना
खूप काही शिकण्यासाठी धडपडताना
ते क्षण अनुभवाची शिदोरी देऊन गेले असेल
त्याचे संचित तुम्हाला आता आयुष्यभर पुरेल.

ऑफिसला आता वेळेत पोहचायची घाई नाही.
कारण उदयानंतर तुम्ही मुक्त असाल.
मी आशा करतो की, कामाच्या व्यापात राहून
गेलेले संकल्प पूर्ण करायला तुम्ही आता वेळ द्याल.

एक मात्र खरं आहे; तुमचा बॉस  उद्या बदलेल.
एवढ्यात सुखावू नका!
कारण बॉस पदाची सूत्रे अलगद तुमच्या 'सौ' कडे सरकेल. 
तेंव्हा मात्र म्हणू नका;मी आता रिटायर झालोय.
कारण आतापर्यंत नोकरीमुळे
न पार पाडता आलेल्या जबाबदाऱ्यांना वेळ द्यावा लागेल.

 सेवानिवृत्ती म्हणजे काय हो
तारखांचा खेळ आहे.
एका ठिकाणाहून दुसरीकडे कायमची
बदली होण्याचा योग आहे.

स्वता:चे छंद आता मनसोक्तपणे जोपासायचे
 पुढील आयुष्य आनंदात घालवायचे.
जे जे संकल्पित मनोरथ आहे 
ते ते पूर्ण करायचे.

आरोग्यादायी, चैतन्यमयी दीर्घायुष्य लाभो आपणाला
या सदिच्छा आम्हा सर्वांच्या वतीने आज या गोड क्षणाला...

 सेवनिवृत्ती शुभेच्छा💐💐