Nojoto: Largest Storytelling Platform

निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना !.. नको

निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना !..
नको रडवूस तू आता पुन्हा निष्पाप डोळ्यांना !..

कधीचे लावले आहेत मी वाटेवरी डोळे ,
जरा धावून येना तू, नको संताप डोळ्यांना !..

सुरांचा कंठ व्याकुळतो तुझ्या डोळ्यात आल्यावर ,
नको देऊस कुठला यापुढे आलाप डोळ्यांना !..

कसे सांगू कितीसे प्रेम मी करतो तुझ्यावरती ,
कधी आभाळ खाली आणुनी तू माप डोळ्यांना !..

सुखाचे स्वप्न बघण्या रात्रभर ते धावले होते ,
म्हणूनी लागली होती सकाळी धाप डोळ्यांना !..

तुझी टिकली ,तुझे झुमके ,किती सुंदर तुझे पैंजण ,
किती मी काय न्याहाळू, किती हा व्याप डोळ्यांना ?..

रिकाम्या मांडवाखाली कधीची थांबली आहे ..
असे इच्छा मुलीची की ,दिसावा बाप डोळ्यांना !..

©जयेश #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

poem shayari मराठी गझल ©जयेश पवार