Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8626067375
  • 12Stories
  • 25Followers
  • 68Love
    702Views

जयेश पवार

पूर्वी कधीच नव्हतो मी शोभिवंत इतका , नक्षत्र होत गेलो कक्षेत रोहिणीच्या !. © जयेश पवार

  • Popular
  • Latest
  • Video
e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

Happy New Year बदलेल कदाचित आता इथे लोकशाही !..
याच्याशिवाय काहीही बदलणार नाही

सरून जे गेले ते वर्ष नव्हतेच माझे ,
अन जे आले आहे तेही माझे नाही !..

बारा महिने तसेच बदलतील भिंतीवर ,
पण भिंतीचा जुना रंग बदलणार नाही !..

©जयेश #poem
#मराठी_गझल
#जयेश_पवार

#happy_new_year

poem मराठी_गझल जयेश_पवार happy_new_year

5 Love

e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

रागही नाही तुझ्यावर येत आता ,
मी कुठे आहे तुझ्या कक्षेत आता !..

बाहुली आहे तुझ्या हातामधे पण,
हरवली आहेस तू जत्रेत आता !..

कोणते नक्षत्र होते सांग माझे ,
कोणते ग्रह नेमके फिरलेत आता ?..

टाळते आहेस माझे नाव घेणे ,
राहिलो नाही तुझ्या चर्चेत आता !..

भेटली होतीस तेव्हा ठीक होतो,
बिघडली आहे पुन्हा तब्येत आता !..

©जयेश पवार #poem
#मराठी #गझल
©#जयेशपवार

poem मराठी गझल ©जयेशपवार

2 Love

e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार


मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे ,
वागले नाही कधी जे चार चौघांसारखे !..

निसटले हातामधूनी हात जेव्हा आपले ,
वाटले होते मला हे जग निसटल्यासारखे !..

फक्त मित्रांनीच केली जन्मभर सोबत मला ,
फक्त मित्रांचेच होते दुःख माझ्यासारखे !..

©जयेश पवार
 #haapyfriendshipday
#poem
#shayari
#मराठी_गझल
©जयेश पवार
e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

समुद्राच्या किनारी राहिले अस्तित्व दोघांचे ,
पुन्हा जर लाट आली तर पुन्हा मग भेटुया नंतर !..

किती आले किती गेले तुझ्याआधी तुझ्यानंतर ,
तरीही वाढले नाही तुझ्या-माझ्यातले अंतर !..
©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

#poem #Shayari #मराठी #गझल ©जयेश पवार

3 Love

e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

लक्ष नव्हते फारसे रस्त्यात दोघांचे ,
त्यामुळे झाले पुढे अपघात दोघांचे !..

आपल्या हातात नव्हते फारसे काही ,
आपल्या हातात होते हात दोघांचे !..

©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

poem shayari मराठी गझल ©जयेश पवार

6 Love

e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

आहेत काही माणसे खेळात या खोटी ,
खोटे खरे पडताळण्याचा खेळ आहे हा !..

हा कोण आहे आत जो दररोज गुदमरतो ,
हा जीव आहे की मनाचा खेळ आहे हा ?

बेरंग जगण्याचे कदाचित चित्र आहे हे ,
चित्रास चित्रे जोडण्याचा खेळ आहे हा !..

©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

poem shayari मराठी गझल ©जयेश पवार

6 Love

e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना !..
नको रडवूस तू आता पुन्हा निष्पाप डोळ्यांना !..

कधीचे लावले आहेत मी वाटेवरी डोळे ,
जरा धावून येना तू, नको संताप डोळ्यांना !..

सुरांचा कंठ व्याकुळतो तुझ्या डोळ्यात आल्यावर ,
नको देऊस कुठला यापुढे आलाप डोळ्यांना !..

कसे सांगू कितीसे प्रेम मी करतो तुझ्यावरती ,
कधी आभाळ खाली आणुनी तू माप डोळ्यांना !..

सुखाचे स्वप्न बघण्या रात्रभर ते धावले होते ,
म्हणूनी लागली होती सकाळी धाप डोळ्यांना !..

तुझी टिकली ,तुझे झुमके ,किती सुंदर तुझे पैंजण ,
किती मी काय न्याहाळू, किती हा व्याप डोळ्यांना ?..

रिकाम्या मांडवाखाली कधीची थांबली आहे ..
असे इच्छा मुलीची की ,दिसावा बाप डोळ्यांना !..

©जयेश #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

poem shayari मराठी गझल ©जयेश पवार

4 Love

e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

दुपारी याच गझलेतील दोन शेर ऐकवले होते , आता पूर्ण गझल ऐकवतो

thanks for your #love

#poem #shayari 
#मराठी #गझल 
©जयेश पवार

दुपारी याच गझलेतील दोन शेर ऐकवले होते , आता पूर्ण गझल ऐकवतो thanks for your #Love #poem #Shayari #मराठी #गझल ©जयेश पवार

729 Views

e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

का उगाळू सारखे त्याला ?
दुःख म्हणजे कोळसा नाही !..

बारकावे शोध माझे तू ,
मी तुला दिसतो तसा नाही !..

©जयेश पवार #poeam 
#shayari
#मराठी_गझल
©जयेश पवार

#poeam #Shayari #मराठी_गझल ©जयेश पवार #poem

7 Love

e5cc821a063bbdba41aab21b762b379f

जयेश पवार

हा कोण आहे आत जो दररोज गुदमरतो ?
हा जीव आहे की मनाचा खेळ आहे हा ?..

©जयेश पवार #poem
#shayari 
#मराठी_गझल
©जयेश पवार

poem shayari मराठी_गझल ©जयेश पवार

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile