Nojoto: Largest Storytelling Platform

#स्त्री..तुझा जन्म महान पहिली माझी ओवी गं त्या लेक

#स्त्री..तुझा जन्म महान
पहिली माझी ओवी गं त्या लेकीच्या त्यागाला
सोडूनिया माहेरा ती उजळवते सासरच्या उंबरठ्याला
दुसरी माझी ओवी गं त्या बायकोच्या प्रेमाला
विसरुनीया आईबापास खुश ठेवे ती पतीदेवाला
तिसरी माझी ओवी गं त्या आईच्या दातृत्वाला
नऊ महीने गर्भात तीच वाढविते बाळाला
चौथी माझी ओवी गं त्या स्त्रीत्वाच्या महात्यागाला
कर्तव्व्याच्या जबाबदारीत ती झोकुन देते स्वतःला
पाचवी माझी ओवी गं त्या बहीणीच्या मायेला
स्वतः दुःखी राहूनीया ती फुलवते
सदा भावाच्या आयुष्याला
सहावी माझी ओवी गं
त्या आजीबाईच्या बटव्याला
संस्काराची शिकवण ती
मुक्तहस्ते वाटते सर्वांना
सातवी माझी ओवी गं
जगातील प्रत्येक महिलेला
विसरूनी ती स्वप्नं स्वतःची
जगण्याचे बळ देते ती
सदा सगळ्यांना
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्रीअस्तित्व