Nojoto: Largest Storytelling Platform

* स्व-लग्न – स्वतःशी स्वतःचा विवाहबंध...* (Sologam

* स्व-लग्न – स्वतःशी स्वतःचा विवाहबंध...* (Sologamy)

स्वतःशीच लग्न… ऐकायला खुप भारी वाटतं,
पण खरंच का ते सुखाचं गीत आयुष्यभर गातं?
ना हळदीचा रंग, ना मंगलाष्टकांचा गजर,
मनाच्या खोलवर फुटतो एकटेपणाचा जागर...

शपथ घेतली स्वतःशी, स्वतःला साथ देण्याची,
पण वळणावर गरज भासते एक जोडीदार होण्याची,
अश्रू पुसायला स्वतःचाच पदर पुरतो म्हणे कित्येकजण,
पण कधीतरी दुसऱ्याच्या मिठीत हरवायला भाग पाडतं एकटेपण...

स्वतःचं आयुष्य सुंदर असतं, हे नक्कीच खरं आहे,
पण शेवटच्या घासाला साथ नसली, तर गोडी उरत नाही,
हसण्याचे लाख क्षण स्वतःलाच स्वतः दिले तरी,
दु:ख वाटण्यासाठी माणूस लागतो, तेव्हा कुणीच मिळत नाही...

संध्याकाळी दमून, आशेने घरी परतल्यावर,
दारात वाट पाहणारं नसलं कुणी तर, घराची ओढ लागत नाही,
पांघरूण लाख रुपयांचे मखमली घेऊ शकलो तरी,
जोडीदाराच्या कुशीतले क्षण, कधी विकत घेऊ शकत नाही...

स्वतःशी लग्न म्हणजे स्वतंत्र आयुष्य वाटत असतं क्षणाला,
पण गहिऱ्या रात्रींची ती एकांत शांतता, सहज कळत नाही,
मनाच्या खोल गर्तेत, कुठेतरी प्रश्न पडतोच कधी तरी,
"एकटेपणाच्या सोहळ्याला उत्सव म्हणावं की मरण" तेव्हा कळत नाही...

उगाच स्वतःचं प्रेम, स्वतःची सोबत, अहंकार असतो मनाचा,
पण माणूस शेवटी माणसातच जिवंत असतो, त्याला एकटेपणा भावत नाही,
आपल्यासाठी कुणी झुरावं, कुणी हाक मारावी, याची तमा कधी नसते,
तरी हीच खरी जगण्याची चव असते, बाकी सगळं फसवं. हे माणसाला समजत नाही...

हे माणसाला समजत नाही...

©मयुर लवटे #Self #Love #Life #Heart #Nojoto #Poetry