Nojoto: Largest Storytelling Platform

खेळ हा मांडला नियतीने असा काही, मुलंबाळं,नातवंड अस

खेळ हा मांडला नियतीने असा काही,
मुलंबाळं,नातवंड असताना ही आज जवळ कुणीच नाही.
कसे झाले असे,काय बरे आमचे चुकले,
चिमटे काढून पोटाला आम्ही,मुलाचे भविष्य घडविले.
छोटीशी आमची खोली,पण आनंद होता खूप सारा,
भारावून गेलो होतो दोघेही,जेव्हा आमचा छकुला जन्मला.
स्वप्न पाहिले मोठे,आपले काहीही होवो ह्याला खूप मोठे करावे,
शिक्षण ह्याला खूप द्यावे,भले उपाशी पोटी आपण दिवस ढकळावे.
घडले ही असेच,मुलास खूप शिकविले,
आता मात्र असे वाटे,आमचेच कुठे नि काय चुकले.
स्वभाव बदलला त्याचा,जेव्हा त्याचे लग्न लावून दिले,
मुलंबाळं झाल्यावर मात्र,आमचे असणे त्याला नकोसे झाले.
चिडचिड करू लागला सतत आणि सतत ओरडू ही लागला,
गप्पगुमान बसा तिथे,नाहीतर वृध्दाश्रमात टाकेल असे धमकाऊ लागला.
असे कसे फिरविले चक्रे नियतीने,कसा हा खेळ मांडला,
मुलंबाळं नातवंड असतानाही,एकलेपणा नशिबी आला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

खेळ हा मांडला...
#खेळहामांडला
हा विषय
Anita Deshmukh यांचा आहे.
चला तर मग लिहुया.