White #देव तो वरचा असे अपुल्या आयुष्याचा पायलट.... शब्दवेडा किशोर माहिती नाही रंग रुप काही माहिती नाही स्वभाव खास त्याचा तरीही आपण ठेवतो ना विश्वास आपल्या आयुष्य नामक विमानाच्या पायलटवर कायमचा तिकीट काढून बसतो विमानात त्याच्याबद्दल नसते काही माहिती तरीही असते ना खात्री त्याबद्दल नसते कुठली चिंता किंवा भिती नाही वाटत कुठलीच काळजी किंवा नाही घेत कुठलीही शंका निर्धास्तपणे बसतो विमानात मात्र मनी कायमच असतो त्याबद्दल विश्वास पक्का असाच ठेवुया दृढविश्वास आपण अशीच ठेवु परमेश्वरावर ही श्रद्धा सहजपणे जगु आपण जीवन मग नाही होणार कधीच कुठलीही बाधा करत रहातो सतत चिंता अन् काळजी भूत,वर्तमान अन् भविष्याची जीवनात आपण का नाही ठेवत मनोभावे देवावर श्रद्धाभाव तोच भवसागरातून नेईल शेवटी आपल्याला तरुन जगाचा सोडावा विचार प्रत्येकाने स्वतः वर प्रेम करावे फक्त आपण मात्र देवावर हवी श्रद्धा अन् भक्ती पूर्ण मग तरंगत राहु आनंद सागरात सर्वजण जसा ठेवतो पायलटवर विश्वास तसाच असला पाहिजे परमेश्वरावर मग नाही करायची काळजी कसलीच तोच नेईल आयुष्याला सन्मार्गावर ©शब्दवेडा किशोर #देवात्मजा