Nojoto: Largest Storytelling Platform

मनातले सारे बोलूनही तिला न समजले हिरवळ नसते कोरडी

मनातले सारे बोलूनही तिला न समजले 
हिरवळ नसते कोरडी पात्याखाली दवं ओले

प्रेम तिचे लिहताना भरले कितीतरी रकाने
ओळी पाझरल्या परी तिला भाव न कळले

चाळशील सहवासाचे एक एक पान तेव्हा
रुचेल तुजला मन कायम तुझ्यासाठी द्रवले
श्वास तू माझा 
चंद्र आणायची तू साक्षीला नि तुझे ते फितूर तारे
आज का तुझे नभांगण पहायचे का राहिले

कसे विसरु मी तू दिलेले सप्तपदीचे दान
भुरळ नव्हतीच सौंदर्याची फक्त मन पाहिले

तुटणार न कधी तुझा माझा रेशमाचा बंध
श्वास तुझे कधीचे माझ्यात आहेत सामावले
 RJ कैलास #तिला न समजले
मनातले सारे बोलूनही तिला न समजले 
हिरवळ नसते कोरडी पात्याखाली दवं ओले

प्रेम तिचे लिहताना भरले कितीतरी रकाने
ओळी पाझरल्या परी तिला भाव न कळले

चाळशील सहवासाचे एक एक पान तेव्हा
रुचेल तुजला मन कायम तुझ्यासाठी द्रवले
श्वास तू माझा 
चंद्र आणायची तू साक्षीला नि तुझे ते फितूर तारे
आज का तुझे नभांगण पहायचे का राहिले

कसे विसरु मी तू दिलेले सप्तपदीचे दान
भुरळ नव्हतीच सौंदर्याची फक्त मन पाहिले

तुटणार न कधी तुझा माझा रेशमाचा बंध
श्वास तुझे कधीचे माझ्यात आहेत सामावले
 RJ कैलास #तिला न समजले