Nojoto: Largest Storytelling Platform

Best तिला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तिला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाजून तिला के फायदे, तिला नाही, तिला फिरवीन माझ्या गाडीवर सोंग, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, तिला आपण,

  • 57 Followers
  • 217 Stories

Dharmendra Gopatwar

#तिला मात्र चंद्राचं कौतुक

read more
Title:: तिला मात्र चंद्राचं कौतुक......
by Dharmendra Gopatwar

      बसलो होतो मी तिच्याजवळ ती चंद्राला बघत होती.....
तिचं मी रूप न्याहाळत होतो , ती मात्र चंद्राची स्तुती करत होती
मी तिच्या गौरवर्ण रुपावर हृदय हारलो, ती मात्र  चंद्रावर मोहित होती 
मला तिच्या सौंदर्याचं तर , तिला मात्र चंद्राचं च कौतुक वाटत होत....

मी तिच्या जवळ बसल्या बसल्या  मला पहिली कविता सुचली ...
तो ही तिच्या सौंदर्यावर ,
आणि ती चंद्रावर मोहित होऊन तिच्या वहीत शंभर कविता केलेलं होत .......

ती चंद्रावर कविता करताना तिला तो चंद्रावरचा डाग ला तिलेची सज्ञा देऊन 
चंद्राचं कौतुक पर वाक्य लिहीत होती ...
मी मात्र तिच्या मानेवरचा तो तीळ बघून 
माझ्या कवितेत तिच्या सौंदर्याचा वर्णन करीत होतो ....

तिच्या डोळ्यात बघता चंद्राचे प्रतिबिंब दिसतं होत 
माझ्या डोळ्यात मात्र तीच च रूप बसलं ....

त्या रात्रीला चंद्राचा त्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशात
तिच्या डोळ्यांना मोह झाला होता ,

मला मात्र असं वाटतं होत की ,
तिच्या रुपामूळे चं
 चंद्राच्या रुपात
आणि त्याच्या प्रकशात आणखी भर पडलेलं असावं....

त्या रात्री चंद्राच्या प्रकाशात आम्ही दोघे बसलेलो
ती मुळात होती कवी ...
पण 
तिच्या सुवर्ण रूपावर ओळी लिहिता - लिहिता 
मी कवी झालो ....

ती चंद्रासोबत ताऱ्या वर दोन ओळी रचली 
मी तिच्या भोवताली
 चमकणाऱ्या काजव्यांवर 
चार ओळी माझ्या कवितेत सामाविष्ट केल्या......

ती कविता करताना चंद्रासोबत तारे आकाश यावर 
तिच्या कवितेची चौथी ओळ पूर्ण केली .....

ती चंद्राला न्याहाळत कविता करताना तिची फक्त चारोळी च झाली

पण
मी तिच्या सौंदर्यावर अख्खं कविताच केला ....✍️

AUTHOR_DHARMENDRA GOPATWAR
कवी- मन (मनातलं ओझं पानावर)

©Dharmendra Gopatwar #तिला मात्र चंद्राचं
 कौतुक

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

read more
प्रेम सगळ्यांनाच होतं ना 
तसंच मला पण झालं होतं 
सगळेच मनापासून करतात हे माहित नाही 
पण मी अगदी मनापासून आणि 
निःस्वार्थ प्रेम केलं होतं, 

पण कळलंच नाही मला आतापर्यंत 
तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी 
कारण, जास्त झालं की, पचत नाही 
आणि कमी पडलं की, 
कुणा दुसऱ्यात मन रमतं, 

पण तीने एकच चुकी केली 
न सांगता एकटं सोडून गेली 
असं सांगितलं असतं तर, 
adjust करून प्रेम केलं असतं 
तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, 
एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं 
पण माझ्या हृदयाशी असं 
खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
कळेना काही मला 
काय बोलू तिला मी, 
ती मला आवडते 
पण तिला आवडतो का मी? 

बोलतो तर रोजच आम्ही 
तेव्हा भावना मांडतो मी, 
निशब्द होते ती बोलताना 
तिला ही जाणतो मी.. 

तुटू नये मैत्री आमची 
म्हणून बराच अबोल असतो मी, 
ती माझ्या दूर नको जायला 
म्हणून व्यक्त व्हायला घाबरतो मी.. 

आहे तशी तरी जवळ माझ्या 
म्हणून मैत्री जपतो मी, 
प्रेम तर खूप करतोय तिच्यावर 
पण असलेलं तरी नातं तुटू नये म्हणून 
प्रेम व्यक्त करायला 
घाबरतो मी..

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
तिला नसेल माझ्या प्रेमाची किंमत 
पण मला आहे ना , 
तिला नसेल पडत फरक, मी असल्या -नसल्याचा, 
पण मला पडतो फरक ती नसल्याचा, 
कदाचित तिला नसेल कडत प्रेमाबद्दल, 
पण मला तर कडतं ना, 
तिला नसेल जमत तसं प्रेम करायला, 
पण मला तर जमतं ना,
तिला नसेल झालं माझ्यावर प्रेम, 
पण मला तर तिच्यावर खरं प्रेम झालं ना, 
मग तिने काहीही केलं, 
रागावली, चिडली, दुखावली तरी मी तर प्रेम करणं सोडणार नाही ना..
कारण तिच्याकडून अपेक्षा केलं तर त्या पूर्ण होतीलच असं नाही ना..
ती आहे तशी चालेल मला, पण प्रेम करणं सोडणार तर नाही नं.. (प्रीत )

Alok Meshram

लग्न

read more
लग्ना आधी जे दिवस असतो  लग्नानंतर गायब   होतो 
जे सुख आधी असतं ते नंतर कुणास ठाऊक  कुठे जातो 
तिला वाटायचो  मी समंजस आणि समजदार 
लग्नानंतर तोच मी झालो अगदी  बेजबाबदार
माझे जिम मध्ये नियमित जाण्याला तीला होता अभिमान 
आता त्याच जिम चा आक्षेप घेत म्हणते,  जिम मधेच असतोस माझासुद्धा नाही तुला भान 
माझा जीन्स आणि टी शर्ट तिला वाटायचा कुल 
आता तिच्याबरोबर जाताना सक्तीने घालावा लागतो फॉर्मल पॅन्ट न शर्ट फुल 
त्रास होऊन देखील आवडायची  तिला माझी गाडी  छोटी 
आता म्हणते मला जास्त लेग स्पेस हवाय गाडी कधी घेणार मोठी 
आधी उठ सुठ आम्ही बाहेर खात होतो  मोघलाई, किव्हा चायनीज 
आता तर सबवे चा सलाड पण  नको असतो कारण त्यात असते  फॅटनिंग मेयॉनीज 
माझ्या प्रत्येक गोष्टीचा आता होतो तिला त्रास 
तुझ्याबरोबर लग्नकरून झाली चूक, माझ्यासाठी आले  होते किती तरी स्थळ खास लग्न

Abhang Nair

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #Nojoto #nojotomarathi #Love #Learning #poem तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय..... झाल-गेल सार आता विसरुन जायचय..... पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

read more
तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय.....

झाल-गेल सार आता विसरुन जायचय.....
पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिला कसं सांगु कि, तिला जपायचय.....
चिंब पावसात बेधुंद होवुन भिजायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

खोल-आत मनात तिच्या फक्त मलाच रहायचय.....
तिच्या त्या पे्माला मनोमन आठवायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिने पहाव पुन्हा म्हणुन खुप-खुप छान दिसायचय.....
आणी फक्त तिच्यासाठी Gentlemen बनायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

तिला घेवुन लहरीं वर मनसोक्त उडायचय.....
आणि फक्त तिच्यासाठी अवघ्या जगासोबत भिडायचय.....

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....

कधी तिच्या कुशीत पडुन मनसोक्त रडायचय.....
तर कधी तिच्यासोबत दिलखुलास हसायचय..... 

तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय..... #NojotoQuote तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
#nojoto #nojotomarathi #love #learning #poem 
तिला आयुष्यात एकदा तरी भेटायचय.....
मनातील सार काही फक्त तिलाच सांगायचय.....

झाल-गेल सार आता विसरुन जायचय.....
पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत जगायचय.....

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile