White *⚔️ कवी कलश आणि संभाजी राजे: शब्दांचा संवाद ⚔️* *छत्रपती संभाजी राजे:* कवी कलशा, सांग, या रणसंग्रामात तुझ्या शब्दांची तलवार किती धारदार? मी देह अर्पील, या काळ्या मातीसाठी, तू शब्द देशील का, या हिंदवी स्वराज्यासाठी? *कवी कलश:* राजे, तुमच्या शौर्यावर लेखणी मी वाहीन, तुमच्या त्यागाचा इतिहास सदैव मी गाईन। तुमच्या तलवारीची चमक कवितेला माझ्या देईन, मराठ्यांच्या तेजाचा जागर सदैव घडवीत राहीन॥ *छत्रपती संभाजी राजे:* कलशा, तलवार उगारली मी अन्यायाविरुद्ध, आणि तू लेखणीने केलं बंडखोर युद्ध। शब्दांसाठी खरंच तु जिवंत राहशील का? मराठ्यांच्या गाथा अशाच पुढे नेशील का? *कवी कलश:* राजे, तुमच्या रक्ताचा रंग ओळींना मी देईन, शब्दांतून हे हिंदवी स्वराज्य रेखाटत मी राहीन। तुमच्या बलिदानाला माझ्या शब्दांचे दान आहे, तुमच्या स्वप्नांना माझा शतशः प्रणाम आहे॥ *छत्रपती संभाजी राजे:* कलशा, माझ्या डोळ्यांत मृत्यू तुला दिसणार नाही, ही तलवार हिंदवी मातीसाठी कधी झुकणार नाही। मी जाईन, पण तू नेहमी कविता बनून राहशील, तुझ्या लेखणीने शिवराय आपला जपशील॥ *कवी कलश:* राजे, तुम्ही अमर, तुमच्या कथा ही अमर, तुमच्या रक्ताने उगवेल एक नवा स्फूर्तीवर। तुमच्या पराक्रमाने पृथ्वी ही सदैव गाजत राहील, शंभू राजे, इतिहास तुमच्या नावाने सदैव लिहिला जाईल॥ ©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Sad_Status #marathi #Poetry #sambhajimaharaj #chhava